इयत्ता दहावीच्या निकालामध्ये येळावी केंद्रात प्रथम क्रमांक
श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरचीby: अन्वर इनामदार

Tasgaon (2025-05-15) -
दिनांक 13 मे 2025 रोजी इयत्ता दहावीच्या निकालामध्ये श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची ने बाजी मारली. येळवी केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुरची गावातील ग्रामस्थांकडून शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . गेली पाच वर्ष आपण सलग 100% श्री सिद्धेश्वर हायस्कूल चा निकाल लागत आहे. व हायस्कूलमध्ये सेमी इंग्लिश व मराठी म या दोन्ही मध्य मधून शिक्षण ही संस्था देत आहे. शाळेतील सर्व स्टाफ चे कौतुक व सर्व विद्यार्थी सर्वांचे अभिनंदन श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.यल.के. पाटील सर, खबाले सर, एस. डी. पाटिल सर, आर. एस. पाटिल सर.यांनी केले. यावेळी गावातील उद्योजक सार्थक किराणा स्टोअर चे मालक उदय सातपुते यांनी प्रथम पाच क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वया पेनचे वाटप केले. व त्यांना शुभेच्छा दिला. यावेळी घाटमाता न्यूज चे पत्रकार शकील मुल्ला उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची चे
श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयाचा मार्च 2025 चा इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे यामध्ये एकूण विद्यार्थी 88 यापैकी 48 विद्यार्थी विशेष प्राविण्यमध्ये तर तीच विद्यार्थी प्रथम श्रेणीत 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने उत्तमरीत्या की इयत्ता दहावीचा निकाल लागला गेलेला आहे यामध्ये राजवर्धन तेजस पाटील याला 97. 80% गुण मिळवून तो येळावी केंद्रात प्रथम आला गेलेला आहे. त्याचबरोबर दहा विद्यार्थी 90% च्या वर आहेत आणि 28 विद्यार्थी 80% च्या वर आहेत यामुळे आसपासच्या परिसरातील सर्व गावकरी त्याचबरोबर पालक वर्गातून सर्व शाळेतील शिक्षक क्षेत्र कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर अभिनंदन याचा वर्षा होत आहे.