सराईत गुन्हेगारांकडून १ पिस्तोल व २ जिवंत काडतुसे जप्त.
तसेच दोन तडीपार गुंडाकडुन दोन घातक शस्त्र जप्तby: सुदाम पेंढारे

पुणे (२६ एप्रिल २०२५) - मा.पोलीस आयुक्त पुणे शहर व मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त,
गुन्हे, पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी
व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने दि. २५/०४/२०२५ रोजी
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सपोनि राजेश माळेगावे, व स्टाफ पेट्रोलिंग करीत
असताना पो.हवा राजेंद्र लांडगे, पोशि अमर पवार व मयुर भोकरे यांना त्याचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी
मिळाली की पर्वती पोलीस ठाणेकडील मोक्कयामधून सुटलेला आरोपी नामे गणेश वाघमारे रा. सर्वे नं १३०,
रामकृष्ण मठासमारे, दांडेकर पूल पुणे याच्याकडे गावठी पिस्तोल असून तो त्याद्वारे दांडेकर पूल परिसरामध्ये
दहशत पसरवून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणत आहे. अशी बातमी मिळाली.
त्याप्रमाणे सहाय्यक माळेगावे यांनी ती सदरील बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश संखे यांना
सांगितली व त्यांनी दिले आदेशा प्रमाणे बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे गणेश
गौतम वाघमारे वय २८ वर्षे रा. सर्वे नं १३०, रामकृष्ण मठासमारे, दांडेकर पूल पुणे यास ताब्यात घेतले
असता त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तोल बाळगल्या बाबत विचारणा केली तेव्हा त्याने पिस्तोल आहे पण ते माझा
मित्र तेजस काशीनाथ शेलार याने विकत आणले आहे ते आमच्या दोघांच्या सुरक्षतेतेसाठी आम्ही दोघे त्याचा
वापर करत असतो. आता ते पिस्तोल तेजस शेलार याच्याकडे दिले आहे. त्याप्रमाणे तेजस काशिनाथ शेलार,
वय २५ वर्षे, रा.सर्वे नं १३०, रामकृष्ण मठासमारे, दांडेकर पूल पुणे याचे अंगझडती घेतली असता त्याच्या
पॅन्ट मध्ये कमरेला खोचलेले १ सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तोल व त्याचे मॅग्जिनमध्ये ०२ जिवंत काडतुसे असे
एकूण ३५,४००/ रु. किं.चे मिळून आले. त्याचेकडे पिस्तोल बाळगण्याच्या परवाण्याबाबत दोघांच्याकडे विचारणा
केली असता त्यांनी परवाना नसल्याबाबत सांगितले.
त्याप्रमाणे नमुद आरोपी विरूद्ध पर्वती पो स्टे गु.र.नं. १३०/२०२५ आर्म अक्ट ३ (२५) सह महाराष्ट्र
पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात
अटक करण्यात आली आहे. सदरचे दोन्ही आरोपीं हे पर्वती व सिंहगडरोड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील
गुन्हेगार आहेत पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
तसेच पुणे जिल्ह्यातून २ वर्षासाठी पर्वती पोलीस ठाणे व सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील
रेकॉर्ड वर असणारे गुंड व तडीपार केलेले अ.क्र १) प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के वय २० वर्षे रा.सर्वे नं.१३२.
दांडेकर पुल पुणे हा पर्वती पोलीस ठाणे अकिंत तसेच २) रोशन अविनाश काकडे वय २४ वर्षे रा. तुकाईनगर
समाज मंदिरामागे सिंहगड रोड पुणे हा धारदार शस्त्रासह मिळून आला म्हणुन त्यांचेवर खंडणी विरोधी पथक
१ व पोलीस स्टेशन कडील स्टाफ अशी संयुक्तीक कारवाई करुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) १३५. तसेच क्रिमीनल लॉ अमनमेंन्ट कलम ७ प्रमाणे
गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.