आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन निष्पाप नागरिकांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत आहे.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम भागात दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांच्या हत्येचा निषेध करत आहे.
by: सुदाम पेंढारे


loading


मुंबई (२४ एप्रिल २०२५ ) - २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांची त्यांच्या धर्माची ओळख पटवल्यानंतर हत्या केल्याच्या बातमीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन खेद व्यक्त करत आहे.

काश्मीर खोऱ्यात सुट्टीसाठी आलेल्या निःशस्त्र आणि निष्कलंक निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन निषेध करत आहे. या घटनेने प्रत्येक विचारवंत माणसाच्या विवेकाला हादरवून टाकले आहे, कारण बळी गेलेले निष्पाप लोक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन, ही खूप गंभीर समस्या आहे.

दहशतवाद हा जगातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक असल्याचा उल्लेख विविध व्यासपीठांवर वारंवार केला गेला आहे. दहशतवादाला मदत करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

यामुळे लोकशाहीचा प्रभाव कमी होणे, धमकावणे, सूड घेणे असे प्रकार घडणे, समाजामध्ये सुसंवादांची कमतरता आणि जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि उपजीविकेचा अधिकार यासह विविध मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत आहे.

केंद्र सरकार या हल्ल्यातील दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलेल आणि पीडितांच्या कुटुंबियांना शक्य तेवढी मदत करेल अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन व्यक्त करत आहे.

सुदाम पेंढारे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य,
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन (IHRO)