“आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेची मासिक मीटिंग उत्साहात संपन्न; नवे पदाधिकारी निवडून सत्कार”
“संघटना बळकट करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार – सांगलीत उत्साही वातावरणात बैठक”by: राकेश कांबळे

सांगली (२० सप्टेंबर २०२५) - आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेची मासिक सर्वसाधारण मीटिंग भारती विद्यापीठ भवन सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण मोहिते यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा अध्यक्ष अन्वर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मोठी उपस्थिती लाभली.
बैठकीत संघटनेच्या जिल्ह्यातील कार्यविस्तारावर चर्चा झाली. “मानव अधिकार चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत”, असा ठाम निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
नवीन पदाधिकारी निवड :
सांगली-मिरज-कुपवाड शहराध्यक्ष – रणधीर कांबळे
सांगली-मिरज-कुपवाड शहर उपाध्यक्ष – मारुती बोरनावर
सांगली-मिरज-कुपवाड शहर सचिव – कुमार भंडारे
मिरज तालुका अध्यक्ष – वसंत अण्णा खांडेकर
मिरज तालुका उपाध्यक्ष – गौस मुजावर
मिरज तालुका सचिव – विद्यासागर आठवले
या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बैठकीत संघटनेचे कार्य समाजातील वंचित घटक, महिला आणि युवकांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात आला. पुढील काळात संघटनेची कामगिरी अधिक जोमाने वाढविण्याचे धोरण आखण्यात आले.
प्रमुख उपस्थिती :
जिल्हा सहसचिव दीपक पाटील, जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ, मिरज तालुका समन्वयक सतीश कांबळे, पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने, पलूस सचिव धनंजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.